spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुलाबी बोंड अळी निर्मूलन करिता मोबाईल व्हॅन द्वारे जनजागृती अभियान

नागपूर :- दिनांक 24/11/2025 रोजी ऍग्रो व्हिजन, विद्यापीठ परिसर, नागपूर, येथे मोबाईल व्हॅन चे उद्घाटन  डॉ. सीडी माई, अध्यक्ष, सल्लागार समिती, ऍग्रो व्हिजन फाउंडेशन, डॉक्टर बाबासाहेब फंड वरिष्ठ शाखत, सीआयसीआर नागपूर, रत्नदीप रामटेके सीआयसीआर, गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक, सिटीसीडीआरए म.रा., जगदीश नेरलवार, प्रकल्प अधिकारी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उदघाटनाला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, व अमरावती या पाच जिल्ह्यातील शेतकरी 150 चे वर शेतकरी, सर्व प्रकल्पाधिकारी आणि कापूस विस्तार सहाय्यक उपस्थित होते.

फ़ेक्स बॅनर स्टील फ्रेमने सुसज्ज विशेष तयार केलेल्या रथावर गुलाबी बोंड अळी (PBW) निर्मूलन, सदन कापूस लागवड (HDPS) अंतर 3× 1½, फूट क्लोजर स्पेसिंग अंतर 3×1 फूट, आणि कस्तुरी कॉटन ब्रेड याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

ध्वनी प्रक्षेपक मार्गदर्शणार्थ ऑडिओ क्लिप, शेतकऱ्यांना देण्यासाठी पॉम्पलेट, लीफलेट, शेतकऱ्यांनी विक्री पूर्वी कापसामधील ओलावा मोजण्यासाठीचे माईश्वर मीटर चे प्रात्यक्षिक, दाखविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्पातल्या पाच जिल्ह्यांमधील 160 चे वर दुर्गम गावात तसेच कृषी विभागाचे कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष शेतकत्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मोबाईल व्हॅन 5 जिल्ह्यात दोन हजार किलोमीटरचे वर फिरण्याचे नियोजन केलेले आहे. मागील तीन वर्षांपासून हे अभियान राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पा मुळे शेतकऱ्यांचे उत्पादन 30 टक्के पर्यंत ने वाढलेले आहे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद गावात मिळत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.