Home Latest News स्वामी अवधेशानंद शाळेत बाल पोळा उत्साहात साजरा

स्वामी अवधेशानंद शाळेत बाल पोळा उत्साहात साजरा

0

<p><strong>संदीप कांबळे&comma; विशेष प्रतिनिधी <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;<&sol;strong> पारंपरिक सणांचा गोडवा लहानग्यांच्या निरागसतेतून अनुभवायला मिळतो&period; अशाच पारंपरिक सणांपैकी एक असलेला बैल पोळा स्वामी अवधेशानंद शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज &lpar;शुक्रवार&rpar; मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला&period; उद्या शनिवार रोजी शाळेला सुटी असल्याने आजच शाळेत बाल पोळा उत्सव साजरा करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या विशेष प्रसंगी शाळेचे बाल विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सजून आपापल्या हातांनी तयार केलेल्या लहानग्या बैलांच्या मूर्ती&comma; रथ व सजावटीसह सहभागी झाले&period; रंगीबेरंगी पोशाख&comma; आकर्षक सजावट&comma; सुंदर रांगोळी आणि मुलांच्या आनंदी चेहऱ्यामुळे संपूर्ण वातावरण सणमय झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या डॉ&period; ईशा मुदलियार यांच्यासह शिक्षक-शिक्षिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता&period; प्राचार्या डॉ ईशा मुदलियार यांनी विद्यार्थ्यांना बैल पोळ्याचे सांस्कृतिक व कृषी परंपरेतील महत्त्व समजावून सांगितले&period; शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलाचे स्थान&comma; त्यांच्या श्रमाचे मूल्य आणि निसर्गाशी असलेले नाते यावर प्रकाश टाकण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ सणांविषयीची ओढच नाही तर संस्कृती जपण्याची जाणीव निर्माण होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ à¤•ेले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version