नागपूर :- श्रीराम फायनान्स कंपनीने आपल्या सेल्स टीमच्या उत्कृष्ट कामगिरीचा व मेहनतीचा गौरव करण्यासाठी 2 जून ते 5 जून 2026 दरम्यान बेंगलोर व मैसूर येथे विशेष पर्यटन सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत कंपनीच्या 32 टीम मेंबर्सनी उत्साहाने सहभाग घेतला. सहली दरम्यान सहभागी सदस्यांच्या राहण्याची व्यवस्था उत्कृष्ट हॉटेल्समध्ये करण्यात आली होती. तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी वातानुकूलित (AC) बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. बेंगलोर व मैसूर येथील विविध पर्यटनस्थळांचे नियोजनबद्ध दर्शन घडवून आणण्यात आले. या सहलीमुळे टीम सदस्यांना दैनंदिन कामकाजाच्या धकाधकीतून विरंगुळा मिळाला तसेच सहकाऱ्यांमधील समन्वय आणि टीमस्पिरिट अधिक दृढ झाले. सर्व सहभागी सदस्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद घेतल्याची भावना व्यक्त केली.
दरम्यान, श्रीराम फायनान्स कंपनीत संपूर्ण विदर्भात विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवारांना कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी विशाल चावरे यांच्या मोबाईल क्रमांकावर 7738362883 संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.



