Related Posts

गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारतीय नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित &OpenCurlyQuote;बिटींग रिट्रीट’ आणि &OpenCurlyQuote;टॅटू सेरेमनी’चा भव्य समारंभ राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला&period; देशाची समुद्री शक्ती&comma; शिस्त&comma; संस्कृती आणि परंपरेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळालेल्या या समारंभाने नौदलाच्या शौर्यपरंपरेला आणि राष्ट्रीय अभिमानाला उजाळा दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी नौदलाच्या हेलिकॉप्टर्सचा रोमहर्षक फ्लाय-पास्ट&comma; नेव्हल सेंट्रल बँडचे आकर्षक सादरीकरण&comma; कुठल्याही मौखिक आदेशांशिवाय सातत्यपूर्ण कवायत तसेच सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींनी सादर केलेला &OpenCurlyQuote;हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ यांना उपस्थित प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली&period; नौदल दिनाच्या औचित्याने समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाईही करण्यात आली होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-23782 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;राज्यपालांच्याउपस्थितीतबिटींगरिट्रीट2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>१९७१ च्या भारत–पाक युद्धादरम्यान ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो&period;<&sol;p>&NewLine;<p>समारंभास नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन&comma; नौदलातील वरिष्ठ अधिकारी&comma; माजी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते&period; यावेळी नौदलाच्या जवानांनी कौशल्यपूर्ण अनोख्या परंपरा सादर केल्या&period; विशेष आकर्षण ठरलेल्या आयएनएस शिकरा हेलिकॉप्टरच्या फ्लाय-पास्ट व ऑपरेशनल डेमोने भारतीय नौदलाची ताकद आणि अत्याधुनिक तांत्रिक क्षमता स्पष्टपणे दिसून आली&period; या भव्य आयोजनातून भारतीय नौदलाने केवळ आपल्या ऐतिहासिक परंपरा जपण्याचा संदेश दिला नाही&comma; तर नव्या पिढीमध्ये राष्ट्रीय अभिमान&comma; शिस्त आणि नौदलाच्या शौर्यकथांबद्दल प्रेरणा निर्माण करण्याचे कार्यही केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राज्यपालांची &OpenCurlyQuote;नेव्ही हाऊस’ येथे मान्यवरांशी भेट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गेटवेवरील कार्यक्रमानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी &&num;8216&semi;नेव्ही हाऊस&&num;8217&semi; येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या&period; यावेळी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला&period;<&sol;p>&NewLine;