spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावधान…’सरपटणारे विषारी प्राणी’ (साप) पडले बाहेर !

सर्पदंशाच्या घटना याच दिवसात सर्वाधिंक

 
सचिन चौरसिया रामटेक ०९ :- शेतीच्या कामाला चांगली सुरुवात झाली असुन सावधान पावसाचं पाणी बिळात शिरल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. यात सापांचाही समावेश असतो. ओल्या ऐवजी कोरड्या जागेत राहणे साप पसंत करतात. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. सध्या खरिपातील पीक काळ असून डवरणी, पर्‍हे रोवणे, फवारणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. मात्र, याच दिवसांमध्ये शेतात घोणस (परळ) सापाने मोठयाप्रमाणात ‘विषारी प्राणी’ बाहेर पडताच आणि सर्पदंशाच्या घटनाही घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी शेतात काम करताना योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्प मित्रानी केले आहे. यावर्षी काही भागात योग्यवेळी पर्‍हे रोहण लावण्याला सुरवात झाली आहे, परंतु, पावसामुळे वातावरणात बदल होत असल्याने, आर्द्रता वाढल्याने अणि बिळामध्ये पाणी घुसल्याने विषारी साप या दिवसात बाहेर पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने घोणस व नाग हया विषारी सापांच्या प्रजाती प्रामुख्याने शेतात दिसून येतात. घोणस सापाचा रंग जमिनीवर व पिकात लवकर ओळखू येत नाही. त्यामुळे शेतात काम करताना घोणस दंशाच्या घटना दरवर्षी सर्वाधिक घडतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या मृत्यूच्याही घटना अधिक असतात. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला सर्पतज्ज्ञांनी दिला आहे.

सावधगिरी हीच सुरक्षा खरी

घोणस (परळ) सापाने दंश केल्यास तत्काळ
लक्षणे दिसून येत नाहीत. अर्धा ते एक तासानंतर लक्षणे दिसून येऊ लागतात. मळमळ, सुजन आदी परिणाम दिसतात. त्यामुळे दंशाची चाहूल लागताच किवा व्यक्तीने शंका व्यक्त केल्यास विनाविलंब दवाखान्यात न्यावे. नागाने दंश केल्यास १० ते १५ मिनटातच मळमळ, उलटी, टाळ गळणे, फेस येणे, तोल जाणे, बोलताना अळखडणे अशी लक्षणे दिसून येतात. दोन्ही विषारी साप असल्याने, उपचारासाठी उशीर झाल्यास मृत्यू संभावतो. परंतु, वेळीच उपचार केल्यास नुकसान टाळता येते.

या दिवसात सर्वच जातीचे साप बाहेर पडतात. शेतामध्ये प्रामुख्याने घोणस साप या दिवसात बाहेर पडतात. तो सुस्त असतो व जमिनीवर त्यांचा रंग सहजासहजी ओळखू येत नाही. सध्या सर्वत्र पाणीच पाणी व चिखल असल्याने साप कोरडी जागा शोधतात, सर्प दंशाची चाहूल लागल्यास किंवा शंका आल्यास तत्काळ दवाखान्यात दाखवावे. बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक, घरघुती उपचाराला बळी पडू नये.
सर्प मित्र : अजय मेहरकु


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.