spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांचा अवैध दारू अड्ड्यांवर दणका; शहापूर शिवारात हातभट्टी उद्ध्वस्त, १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज :- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. शहापूर गावातील एका नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार भोंगाडे यांना शहापूर गावातील नाल्याच्या परिसरात अवैध हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी जितेंद्र युवराज थोटे (वय ३७ वर्षे, रा. गणेश वार्ड, शहापूर, ता. जि. भंडारा) हा नाल्याच्या काठावर अवैध रित्या हातभट्टीची दारू गाळताना रंगेहाथ मिळून आला.

मोठ्या प्रमाणात रसायने आणि साहित्य जप्त पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून १६ प्लास्टिकच्या पन्नीमध्ये प्रत्येकी ५० किलो याप्रमाणे एकूण ८०० किलो सडवा मोहफूल रसायन जप्त केले. या रसायनाची किंमत १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय हातभट्टी पेटवण्यासाठी लागणारे ५०० किलो जळाऊ लाकूड (किंमत ५ हजार रुपये) आणि लोखंडी ड्रम (किंमत ५०० रुपये) असा एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

कायदेशीर कारवाई आणि पोलीस पथक या प्रकरणी आरोपी जितेंद्र थोटे याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा (अ.क्र. ३५४/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोंगाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Popular Articles