spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा: मानेगाव शिवारात आढळलेल्या नवजात बालिकेच्या वारसांचा शोध! 

– पालकांनी ६० दिवसांत संपर्क न साधल्यास बालिकेला दत्तक प्रक्रियेसाठी दिले जाणार

 हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- पोलिस स्टेशन लाखनी हद्दीतील ग्राम मानेगाव येथील अशोक वासनिक यांचे शेत शिवारात दिनांक १३ जानेवारी,२०२६ रोजी अंदाजे १०. दिवसाची नवजात बालिका मिळुन आली होती. सदर बालिकेला पोलिस स्टेशन लाखनी यांचे कडुन बाल कल्याण समिती भंडारा यांचे कडे सुपुर्द करण्यात आले असुन सद्यस्थितीत बालिका बाल उदय दत्तक संस्था पिंगलाई माता मंदिर समोर शुक्रवारी रोड भंडारा येथे असलेल्या शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे. या नवजात बालिकेचे पालक/नातेवाईक याना भेटण्याचे आव्हाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भंडारा कडुन करण्यात येत आहे. ६० दिवसाच्या आत कोणत्याही व्यक्ती कडुन संपर्क न साधल्यास बाल कल्याण समिती भंडारा यांचे आदेशानुसार बालिकेला दत्तक प्रक्रीये करीता कायदेशीर मुक्त करण्याची कारवाई करण्यात येईल. बालिकेच्या संबंधात माहिती करीता मो.क्र. ९३०९११०८९७ (नितिनकुमार साठवणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भंडारा. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भंडारा पत्ता पहिला माळा जिल्हा मजुर संघ ईमारत नागपुर नाकाजवळ, भंडारा कार्यालयाशी संपर्क साधावे.

Popular Articles