– माजी आमदार सेवकभाऊ वाघाये पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर
हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी: स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, लाखनी येथे ७७ वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार माननीय सेवकभाऊ वाघाये पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ, केसलवाडा/वाघ यांच्या अध्यक्षा सरोज सेवकभाऊ वाघाये पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या ध्वजारोहणाचा मान माजी आमदार सेवकभाऊ वाघाये पाटील यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गीत, नृत्य आणि भाषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे आणि प्रा. स्मिता तितरमारे यांनी केले. राष्ट्रगीताने आणि ‘भारत माता की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता.








