सुरज बंडीवार, पांढरकवडा ११ : अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संतप्त झालेल्या भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन भोई समाजाच्या वतीने केळापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास,अकोला येथील गुलजारपुरा भागात भोई समाजाच्या एका १३ वर्षांच्या मुलीवर तोहीद समीर नावाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असता, आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून,तो गुलजारपुरा भागातीलच रहिवासी असल्याचे समजते.
मागण्या आणि इशारा भोई समाज युवा मंचने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा, जेणेकरून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल.जर आरोपीला योग्य शिक्षा मिळाली नाही,तर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रफुल नांन्ने, तसेच पहापळ गावचे अध्यक्ष सागर कार्लेकर, उपाध्यक्ष गजानन मांढरे, सचिव किशोर रुयारकार, अतुल रुयारकार, रामराव डहारे, चंद्रभान मांढरे, होणाजी मांढरे, चंदु रुयारकार, शुभम भनारकार, सुरज मांढरे, आकाश पारशिवे, नामदेव रुयारकार व ईतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होते या घटनेची दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पांढरकवडा पोलीस स्टेशन यांनाही देण्यात




