Home Latest News पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलीसांनी घेतला नाचण्याचा मनसोक्त आनंद

पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पोलीसांनी घेतला नाचण्याचा मनसोक्त आनंद

0
144
सुरज बंडीवार: पांढरकवडा ११ : सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.त्यानुसार प्रत्येक सणोत्सव दरम्यान उत्सव योग्यरीत्या पार पाडण्यासाठी पोलिसांवर जवाबदारी असते दरम्यान पोलिसांना कोणतेच सण उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो प्रत्येकवेळी उत्सवाच्या वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होतात त्यांना बंदोबस्तावर हजर राहावे लागते मात्र पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन मध्ये श्री गणेशमूर्तींचे विराजमान करीत श्री गणेश मूर्तीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करीत मनमुराद आनंद लुटला. पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त विधिवत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. दरम्यान दहा दिवस दररोज पोलिस अधिकारी, कर्मचारीच्या हस्ते आरती करीत गणेशोत्सव साजरा केला.
दहा दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जन कार्यक्रम होणार असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर राहावे लागणार होते त्यामुळे श्री गणेश विसर्जनामध्ये भर पावसात चिंब भिजून पोलिसांनी कर्तव्यदक्ष भूमिका बजावून तिसऱ्या दिवशी पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या श्री गणेश मूर्तीचे थाटात विसर्जन केले. यावेळी विसर्जन दरम्यान सर्व पोलिसांनी सारखा पेहराव परिधान करून वाद्याच्या तालात श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढत जल्लोषात विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी श्री गणेशमूर्ती विसर्जनात पांढरकवडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, सागर पेंढारकर, रमाकांत खंदारे, निलेश सरदार, वाहतूक उपशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजिव खंदारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, स्वप्निल कावरे, सचिन रघुपती यासह पोलीस अधिकारी कर्मचारिसह इतर कर्मचारी उपस्थित होते.