spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का, महायुतीने गुलाल उधळला; राजेश पाटील नवे चेअरमन

– गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे राजेश पाटील यांनी शशिकांत चुयेकर यांचा पराभव करत अध्यक्षपद पटकावले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या या निवडणुकीत महायुतीने जल्लोष केला, तर सतेज पाटलांच्या हातून सत्ता निसटली. चंदगड तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड तालुक्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. या निवडणुकीत पारडं जड असतानाही सतेज पाटील यांच्या हातून सत्ता गेली आहे. तर, महायुतीत जल्लोषाचं वातावरण सुरू झालं आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज ही निवडणूक पार पडली. यावेळी सुरुवातीलाच समविचारी आघाडीच्या सदस्यांनी सरकार नियुक्त संचालकांच्या मतदानावर आक्षेप घेतला. हे सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार कसा? असा आक्षेप या सदस्यांनी घेतला. मात्र, सरकारी अध्यादेश, नियम आणि कोर्टाचा दाखला देत समविचारी आघाडीचा हा आक्षेप फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली.

पाटील यांना 16 मते तर…

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना 16 मते मिळाली. तर समविचारी आघाडीचे शशिकांत चुयेकर यांना 13 मते मिळाली. सरकार नियुक्त संचालकांची मते पाटील यांच्या पारड्यात गेल्याने पाटील यांचा विजय झाला आहे.

Popular Articles