खापा :- क्रांतीसुर्य बिरसा मुंडे यांची १५० वी जयंती महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिरंजी येथे प्राचार्य संदीप भोंडे व पालक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विविध नृत्यद्वारे आपली कला प्रस्तुती केली. 

या प्रसंगी प्राध्यापक दळवी व शिक्षक दीपक नारे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शिक्षक काळमेघ, चौधरी, टेकाळे, तवले, शिक्षिका बुरहान, दहिकर, परबत, पालक बाजनघाटे, चटकवार, आहाके, उईके, बोटरे, खंडाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालक दिनेश हजारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामकृष्ण टेकाळे यांनी केले.








