किशोर साहू, मौदा ता.१७:- घोटमुंढरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेत महानायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खात पंचायत समिती सर्कल प्रमुख लोकेश राखडे , सरपंचा गेडाम , तंटामुक्ती अध्यक्ष मडावी, शाळा समितीचे अध्यक्ष उदय पांडे, प्रतिष्ठित नागरिक लवा पटले, श्रीनाथ पटले सह शाळा समिती इतर पदाधिकारी व समस्त विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महानायक बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.याप्रसंगी शिवसेनेचे खात पंचायत समितीचे सर्कल प्रमुख लोकेश राखडे यांनी शाळेत असलेल्या कॅम्पुटर रूममध्ये एअर कंडिशन लावण्याकरिता शाळेला आर्थिक मदत केली.








