spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रथम पुरस्कार : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड

– त्रिनेत्र बावनकर व अदविक कोहळे यांनी केली निर्मिती

– गड किल्ल्यातून जपला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने रामटेक गावातील बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियाच्या युगात वावरणारी बच्चे कंपनी आजही किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची परंपरा आणि त्यांचा शौर्यवारसा विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सृष्टीसौंदर्य बहुद्देशीय संस्था, रामटेक तर्फे आयोजित “किल्ला स्पर्धा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी गांधी चौक परिसरात गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि स्थलदुर्ग या प्रकारातील किल्ला मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात त्रिनेत्र बावनकर व अदविक कोहळे यांनी तयार केलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेत गट क्र. १ (इयत्ता १ ते ७) मध्ये ३८ आणि गट क्र. २ (इयत्ता ८ ते १२) मध्ये २७ असे मिळून एकूण ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गट क्र. १ मध्ये अदविक कोहळे याच्या रायगड किल्ला मॉडेलने प्रथम क्रमांक मिळवला. तृणिका धमगाये हिला द्वितीय आणि मानवि लेंडे हिला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे गट क्र. २ मध्ये त्रिनेत्र चंद्रशेखर बावनकर याच्या सुद्धा रायगड मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. या मॉडेल ला तयार करण्यासाठी मला चार दिवस लागले असे त्रिनेत्र ने माहिती देताना सांगितले. त्याचप्रमाणे उन्नती सोमनाथे हिला द्वितीय तर खुशी तल्लमले हिला तृतीय क्रमांक देण्यात आला. विजेत्यांसह सर्व स्पर्धकांना एकूण ७,७०० रुपयांची पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि शिवाजी महाराजांचे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण नत्थू घरजाळे, जगदिश गुजरकर, रेशमा बावने आणि प्रतिज्ञा वरकडे यांच्या हस्ते करण्यात आले. किल्ल्यांचे परीक्षक म्हणून आर्किटेक्ट अंजली नरड यांनी काम पाहिले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल, किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, जनप्रभा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र जोशी यांसह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Popular Articles