spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भय्यूजी महाराज बी.एड. महिला कॉलेज येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- बिरसा मुंडा आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज येथे, आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींनी खुशबू जोशी ह्यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी प्रतीक्षा पांगुळ प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थीनी धनश्री बंदे यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी तन्वी खुपाट, अनुश्री चिल्लावार, वैष्णवी थाटे, विशाखा शेंडे, मोनाली डोमडे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी भावना मडावी, अक्षता गराड यांनी प्रश्नमंजुषेचे आयोजन केले. तर द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी पद्मीनाक्षी चव्हाण व प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींनी जुही गेडाम, पूनम कुळमेथे यांनी कविता सादर केली तर द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी समृद्धी डंभारे यांनी गीत सादर केले. तसेच द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थीनी वेदांती काकडे यांनी चारोळी सादर केली. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थीनी मनिषा आत्राम, तेजस्विनी बोडेकर, समृद्धी खडसे, अनुजा मुद्दसनवार, दिव्या टेकाम, प्रतीक्षा तोडसाम यांनी नृत्य सादर केले. तसेच द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी हर्षा शेंडे व प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींनी अनुराधा आत्राम यांनी वेशभूषा सादर केली. प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी सिमरन शेख, समृद्धी खडसे, सुप्रजा रासमवार यांनी घोषवाक्य सादर केले. प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी मनिषा आत्राम, सारिका थोडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा खुशबू जोशी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला बी.एड. प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी व बी.एड. द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके, डॉ. अंशु साहू, डॉ. सुजया बिजवे, डॉ. सारिका निकम, प्रा. बालाजी राठोड, प्रा. राहुल पाईकराव, प्रा. शेखर ख्रिस्ती, प्रा. पंकज आगलावे, प्रा. मनवर, प्रा. अशोक राऊत, प्रा. जपिंदरकौर कानसे, प्रा. जान्हवी भोयर, नलिनी करपते व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थींनी सारिका आत्राम व प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी आर्या राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन हे प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी सारिका थोडगे यांनी केले व त्या नंतर विशाखा शेंडे यांनी पसायदान घेऊन अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.