spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर महापालिका निवडणूक : भाजपमध्ये उमेदवारी अर्जावरून गोंधळ; कार्यकर्त्यांसमोर ‘कोणाचा फॉर्म घ्यावा?’ असा प्रश्न…

चंद्रपूर :- शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना भाजपमध्ये उमेदवारीसंदर्भातील गोंधळ अधिक चव्हाट्यावर आला आहे. आजपासून (१६ नोव्हेंबर) पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्जांचे वितरण सुरू झाले. मात्र एकाच पक्षाचे दोन वेगवेगळे गट आपल्या-आपल्या पद्धतीने अर्ज वाटू लागल्याने कार्यकर्तेच संभ्रमात सापडले आहेत.

एका बाजूला, आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज देण्यात येत आहेत. हा फॉर्म भरून तो भाजप शहराध्यक्ष सुभाष कासांना गोटूवार यांच्या सूचनेनुसार पुन्हा आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातूनही स्वतंत्ररित्या उमेदवारी अर्जांचे वितरण सुरू आहे. या प्रक्रियेसाठी राहुल पावडे यांच्याकडे प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपमधील अंतर्गत मतभेद किंवा गटबाजी ही नवी गोष्ट नाही. यापूर्वीही ती रस्त्यावर आली आहे. मात्र, अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. आता तर फॉर्म वाटपापासून ते फॉर्म जमा करण्यापर्यंतही गटबाजी स्पष्ट दिसू लागली आहे.यामुळे भाजप कार्यकर्त्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिला आहे ,नेमका कोणाचा फॉर्म घ्यावा?” याचा परिणाम उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेलाही भोगावा लागू शकतो, अशी चर्चा पक्षवर्तुळात सुरू आहे.

Popular Articles