किशोर साहू, मौदा, ता.४ :- ग्रामपंचायत कार्यालय तांडा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती त्यांच्या फोटोला माल्यार्पण व पूजाअर्चना करून साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे नागरिकांनी न्याय मिळविण्यासाठी अहिंसेचा मार्ग पत्करावा असे सरपंच विनोद गभने यांनी याप्रसंगी उपस्थितांना सांगितले, उपस्थित इतर मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.याप्रसंगी उपसरपंच राजेंद्र खंदारे, माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव ,ग्रामपंचायत सदस्य विलास डोरले ,सौरभ झिंगरे, पोलीस पाटील पल्लवी गेडाम ,तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर डोरले, सीआरपी स्वाती डोरले, राहुल डोरले, दिनेश थोटे, जनार्दन गिरीपुंजे, छबिलाल नेवारे ,फुलचंद गेडाम, भगवान गभने सह ग्रामस्थ उपस्थित होते.








