spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी 

खापा :- नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने खापा येथील बाजार चौकस्थित गांधी पुतळ्याजवळ जयंती दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे पुतळ्याला व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पणासह अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, सेवादल अध्यक्ष नारायण लांबट, केदारनाथ बहुद्देशिय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश तालपल्लीवार, सुरेश मारोतकर, अशोक दंदे, राजु ढेंगरे, रमेश लष्करे, सिताराम साळवे, अशोक बारापात्रे यांचेसह सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील नागरीक उपस्थित होते.

Popular Articles