spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून विचारपूस

जेजुरी :- भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जेजुरी येथील दिंडी सोहळयातील अपघातग्रस्त वारकऱ्यांची विचारपूस करत त्यांना दिलासा दिला.

जेजुरीजवळ दिंडीसोबत पायी चालताना ट्रकने धडक दिल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांवर काकडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. चव्हाण यांनी सोमवारी हॉस्पिटलमध्ये या वारकऱ्यांची भेट घेत सरकार म्हणून अपघातग्रस्त तसेच मृत वारकऱ्यांना भाजपा सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. सरकारच्या माध्यमातून सर्व अपघातग्रस्तांना मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध होत असून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याची हमी चव्हाण यांनी यावेळी दिली.

Popular Articles