spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील अशोभनीय वक्तव्याचा भाजपकडून तीव्र निषेध

– येरखेडा भाजपच्या वतीने कामठी पोलीस ठाण्यात निवेदन; संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी

कामठी :- भारतीय जनता पार्टी, येरखेडा यांच्या वतीने राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्याचा तीव्र व जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने कामठी पोलीस ठाण्यात निवेदन (डेप्युटेशन) सादर केले. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी अशोभनीय, आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा येरखेडा अध्यक्ष राकेश काळे, येरखेडा नगरपंचायत अध्यक्ष राजकिरण बर्वे, सभापती मनीष कारेमोरे, नगरसेवक सुशांत सलाम, नगरसेविका मनीषा गोंडाणे, नगरसेवक मनोज बडवाईक, राजेश पिपरेवार, प्रशांत काळे, महिला अध्यक्ष राजेश्री घिवले, सरिता भोयर, शीतल चौधरी, अनुसूचित जाती अध्यक्ष राकेश खरोल, अल्पसंख्याक अध्यक्ष तारिक, भाजपा महामंत्री मनीष भाटी, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पोटभरे यांच्यासह विलास पाटील, सोनू सूर्यवंशी, रिषभ भोवते, आयुष देवके, आयुष कानोजिया, जया वाडीभस्मे, रेखा मराठे, गोलू पिल्ले तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अशोभनीय वक्तव्याचा तीव्र निषेध!”

भारतीय जनता पार्टी सदैव जनतेचा सन्मान, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण यासाठी ठामपणे उभी आहे. कोणत्याही व्यक्तीविषयी आक्षेपार्ह किंवा अशोभनीय वक्तव्य करून सार्वजनिक जीवनातील शिष्टाचाराला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा लोकशाही मार्गाने तीव्र निषेध केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles