spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे ‘कॅरी ऑन’ धोरणासाठी कुलगुरूविरोधात आंदोलन

 

नागपूर, ३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने जोरदार आंदोलन केले. विद्यापीठाने तातडीने विद्वत परिषद बोलावून ‘कॅरी ऑन’ धोरण लागू करावे, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

विद्यापीठाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहत आहेत, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. यापूर्वी तीन वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर, कुलगुरूंनी २ ऑगस्ट २०२५ रोजी विद्वत परिषदेची बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक विचार केला जाईल आणि विद्यापीठाकडून मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या त्रुटी मान्य करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाने त्वरित निर्णय घेऊन ही समस्या सोडवावी, अशी ठाम भूमिका भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने घेतली आहे.

हे आंदोलन भारतीय जनता पार्टी, नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष बादल राऊत आणि विद्यार्थी आघाडीचे शहर संयोजक शिवेष हारगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशू गुमगावकर आणि शंतनु झाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे यश गौर, संकेत जवळकर, भावेश मातघरे, अखिलेश बिबटे, लिखित गणवीर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles