– २२ पैकी १६ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे विजयी
सुरज बंडीवार, पांढरकवडा :- नगरपरिषदेची निवडणुक २ डिसेंबर रोजी झाली असता त्यानंतर काही नगरपरिषद कोर्टाच्या निर्णयाने लांबनीवर पडल्याने तब्बल १९ दिवसाने पांढरकवडा नगरपिषदेचे निवडणुक निकाल घोषित झाला. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळ पासुनच सर्वच सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक कार्यालयाकडे धाव घेत नगरपरिषदेच्या ११ प्रभागातील उमेदवार व त्यांच्या कार्यकत्यांनी ठिक ९ वाजता शहिद नागेश्वर जिड्डेवार भवन समोर एकच गर्दी केली सदर ११ प्रभागाची मतदान मोजणी ३ टप्यात असल्याने पहिल्याच टप्यात हाती कल आल्याने काही पक्षाच्या उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणातुन काढता पाय घेतला आज झालेल्या मतमोजणीत नगराध्यपदासाठी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आतिष उर्फ सोनु बोरेले यांनी शिंदे शिवसेनेच्या डॉ अभिनय नहाते यांच्यावर मात करुन तब्बल २०३ मताच्या फरकांनी विजय मिळवत नगरपरिषदेवर भाजप पक्षाचा झेंडा रोहला नगराध्यपदासाठी शिंदे गटाचे उमेदवार डॉ अभिनय नहाते ७६२६ मतावर समाधान मानावे लागले तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार विनोद तिवारी यांनी ही चांगली मजाल मारत १४८६ मते घेवुन ते तिसऱ्या क्रमांकावर राहीले नगरसेवकासाठी प्रभाग १ व २ मध्ये शिंदे सेनेने मजाल मारत दोन्ही सिट आपल्या ताब्यात घेतली तर प्रभाग ३ मध्ये भाजपाने आपले खाते उघडून दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित केले. प्रभाग ४ मध्ये दोन्ही नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे विजयी झाले. प्रभाग ५ मध्ये १ शिंदे सेना व १ भाजप प्रभाग ६ मध्ये १ शिंदे सेना तर १ भाजप प्रभाग ७ मध्ये दोन्ही शिवसेना शिंदे गट ८ मधे १ शिवसेना शिंदे व १ भाजप कॉग्रेस प्रभाग ९ दोन्ही शिवसेना शिंदे गट प्रभाग १० मध्ये १ भाजप व १ शिवसेना शिंदे गट तर प्रभाग ११ मध्ये दोन्ही शिंदे सेनेचे नगर सेवक निवडून आले. २२ पैकी १६ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे तर भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले. आज झालेल्या मतमोजणीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत मत मोजणीची प्रक्रीया पार पडली.




