spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मैत्रीचा रक्तरंजित अंत! ३ हजार रुपयांच्या उधारीवरून मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; आरोपी गोविंदा नेवारे गजाआड

हंसराज भंडारा :- भंडारा शहरात मैत्रीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उधार दिलेल्या ३००० रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एका तरुणाने आपल्याच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. विशाल विजय लिमजे (वय ३२, रा. लाला लजपतराय वॉर्ड, भंडारा ) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी गोविंदा गोपाल नेवारे (वय २५) याला तातडीने अटक केली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विशाल लिमजे आणि आरोपी गोविंदा नेवारे हे एकमेकांचे जुने मित्र होते. विशालने गोविंदाला घरगुती कारणासाठी ३००० रुपये उधार दिले होते. या पैशांच्या परतफेडीवरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. सोमवार च्या रात्री ११:३० च्या सुमारास विघ्नहर्ता चौक परिसरात याच पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात गोविंदाने आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

पोरक्या विशालचा असा झाला अंत मृतक विशाल लिमजे याचे आयुष्य अत्यंत संघर्षाचे होते. विशालला आई-वडील नसल्याने तो लाला लजपतराय वॉर्ड येथे आपल्या मामांकडे राहायचा. ज्या मित्रावर त्याने विश्वास टाकला, त्याच मित्राने अवघ्या ३००० रुपयांसाठी त्याचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची तत्परता आणि कारवाई घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला पोलिसांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शास्त्री चौक येथील ‘यस बार’मध्ये वेटर म्हणून काम करणारे फिर्यादी राजेंद्र नारायण लढाईकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोविंदा गोपाल नेवारे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खुनाचा गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.