spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वरठी येथे बंद घरात घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

हंसराज,भंडारा वरठी :- येथील शास्त्री वार्ड, सोनुली रोड परिसरात राहणाऱ्या संजय सोमा पडोळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १४ मे ते १७ मे २०२६ दरम्यान घडली.

फिर्यादी संजय पडोळे हे आपल्या कुटुंबासह सासुरवाडीला गेले होते आणि तिथून आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी छत्तीसगडमधील दुर्ग येथे गेले होते. १७ मे रोजी सकाळी त्यांचा पुतण्या पियुष पडोळे हा वर्तमानपत्र वाटप करत असताना त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने याची माहिती फिर्यादीला दिली.

पडोळे कुटुंबीय घरी परतले असता, घरातील कपाटातून १८ ग्रॅमचे सोन्याचे गोफ, अंगठ्या, लॉकेट, कंठमणी आणि नथ असे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने व ६३ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख १३ हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

वरठी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ३०८/२०२६, कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (ए) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय मडावी करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.