spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खैरी गावातील नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; जुनी कामठी पोलिसांकडून तपास सुरू

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील एका मोकळ्या जागेत 12 मार्च 2026 ला सकाळी 9 दरम्यान एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता ज्याची ओळख अजूनही पटलेली नाही या घटनेला आज या घटनेला तीन महिने लोटत नाही तर त्याच गावातील खैरी गावाजवळ फॉर्मेस फर्निचर कंपनीच्या शेजारी पाण्याने भरलेल्या नाल्यात सुमारे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२ जुलै) सकाळी सुमारे ७.३० वाजता खैरी गावचे पोलीस पाटील अशोक पांडुरंग मानकर यांना नाल्यात मृतदेह दिसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ जुनी कामठी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला.

प्राथमिक पाहणीत मृत व्यक्ती अंदाजे तीन दिवसांपासून पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या अंगावर काळ्या रंगाची फुल पॅन्ट, राखाडी रंगाचा टी-शर्ट व कमरेला काळा पट्टा होता. तसेच खिशातून दोन देशी बिडीची बंडले आणि ₹२८० रोख रक्कम मिळाल्याची नोंद आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जुनी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अज्ञात मृताची ओळख पटविण्यासह पुढील तपास सुरू केला आहे.

Popular Articles