– महाराष्ट्रातील 82 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
नवी दिल्ली :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण १ हजार ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 82 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून, विविध क्षेत्रांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कर्तव्य बजावताना जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे अथवा गुन्हेगारांना अटक करणे यासाठी केलेल्या उल्लेखनीय शौर्यपूर्ण कार्याबद्दल शौर्य पदक प्रदान केले जाते. यंदा देशभरात एकूण ३०१ शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी २७२ पोलीस कर्मचारी आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.
सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी प्रदान केले जाते. तर कौशल्यपूर्ण कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय सेवेसाठी पदक – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रदान केले जाते.- 92 पदके विशिष्ट सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ८३ पोलीस सेवा, ४ अग्निशमन सेवा, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि २ सुधारात्मक सेवा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी प्रदान करण्यात आले आहे.
तसेच, देशभरात एकूण ६६४ पदके – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ६०६ पोलीस सेवा, २८ अग्निशमन सेवा, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि १२ सुधारात्मक सेवा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 37 पोलीस कर्मचारी, 2 अग्निशमन सेवा कर्मचारी, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी विविध पदके जाहीर केली जातात.
महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदके प्राप्त अधिकारी व कर्मच्यांची यादी
शौर्य पोलीस सेवा (GM)
1.राजू पांडुरंग गवळी,पोलीस उपनिरीक्षक
2.वासुदेव राजम मडावी,पोलीस उपनिरीक्षक
3.दिलीप विठ्ठल आत्राम,नाईक पोलीस शिपाई
4.अजय गोपाळराव मडावी,पोलीस शिपाई
5.गणेश चंद्रम दुब्बुला,पोलीस शिपाई
6.विजय झरू मडावी,पोलीस शिपाई
7.भूपेश मारोत्राव जुनमाके,पोलीस शिपाई
8.दलसू कटिया बोगामी,पोलीस शिपाई
9.राजेश शामराव किरांगे,पोलीस शिपाई
10.मसा बोरा अत्राम,नाईक पोलीस शिपाई
11.यतिश विजयराव देशमुख, भापोसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक
12.विजय किश्तय्या कोडपे,पोलीस हवालदार
13.दशरथ रामशहा मडावी,नाईक पोलीस शिपाई
14.राकेश राजम बेडकी, पोलीस शिपाई
15.सुधाकर जगन पोर्टे,पोलीस शिपाई
16.श्रीनिवास समय्या निष्टुरी,पोलीस शिपाई
17.गणेश हनमंतु गजीवार,पोलीस शिपाई
18.नितेश प्रभुदास टेंबेकर,पोलीस शिपाई
19.शिवाजी मेस्सो हिचामी,पोलीस शिपाई
20.संजय मल्लेश कंकाबंदवार,पोलीस शिपाई
अग्निशामक सेवा
1. मनोज विश्वनाथ सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी
2. रवींद्र नारायणराव आंबुलेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी
3. अनिल वसंत परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी
4. ईश्वर खंडू कांबळे, वरिष्ठ स्थानक अधिकारी
5. योगेश हिरालाल पवार स्थानक अधिकारी
6. दत्तात्रय अशोक भोसले, स्थानक अधिकारी
7. महेश आनंद गुदलकर, चालक-परिचालक
8. चिंतामणी शिवाजी खांडेकर, अग्निशामक
9. विकी नागेश सरवदे ,अग्निशामक
10. दर्शन घनश्याम पावडे ,अग्निशामक
11. रमेश जीवन कोळी अग्निशामक
12. राजेश विष्णू राणे, चालक-परिचालक
13. हर्षल शंकर कटके, अग्निशामक
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) पोलीस सेवा
१. शिरीष रवींद्र जैन – अतिरिक्त पोलीस महासंचालक
२. सुभाष नानासाहेब भुजंग -पोलीस उपअधीक्षक
३. संजय राजाराम वायचळे – सहायक पोलीस उपनिरीक्षक
सुधारात्मक सेवा
१. संजीव सखाराम घाणेकर, सुभेदार,
२. संजय राजारामजी तलवारे, हवालदार,





