spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुध्द पौर्णिमा, महाराष्ट्र व कामगार दिवस उत्साहात साजरा

कन्हान :- आइडियल एजुकेशन सोसायटी कन्हान व्दारे संचालित आदर्श हायस्कूल कन्हान व आयडिय ल हिंदी कॉन्व्हेंट स्कूल कन्हान येथे बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस कार्यक्रम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वैद्य यांच्या अध्यक्षतेत आणि संस्थेचे सचिव भरत साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शुक्रवार (दि.१) मे २०२६ ला राजे छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वंदे मातरम् या राष्ट्रगीता नंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन ध्वजगीत व राज्यगीत गायन करून भारत देश व महाराष्ट्र राज्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या औपचारिक स्वागता नंतर मुख्याध्यापक गिरजाशंकर यादव यांनी प्रास्ता विकातुन कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वरिष्ठ शिक्षक शैलेश सोलंकी यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची माहिती देत सर्वांनी ते आत्मसात करून त्यांच्या मार्गावर चालावे असे आवाहन केले. व महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली. तसेच कामगार दिनाचे महत्त्व सांगत कामगारांच्या योगदानावर प्रकाश टाकला. संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भरत सावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करित देशातील कामगारांची स्थिती मांडली आणि भगवान बुद्धां च्या विचारांबद्दल माहिती दिली. ध्वज रक्षकाची जबाब दारी अरविंद नेवारे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनोज डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक ताराचंद चापरे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक अलंकार राखडे, नरेश सर, शिक्षिका रक्षा शुक्ला, प्रीती बोपचे, प्रतिभा तिघरे, पूजा तिवारी, विजया मुंडले, रूपाली उके, प्रांजली डोकरीमारे, श्रद्धा ठाकरे सह शिक्षक, शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोटीन बार वितरित करण्यात आले.

Popular Articles