सावनेर :- फिर्यादी नामे श्रीमती राधाबाई चक्रधर आवते, रा. यशवंत बाबा, झोपडपट्टी सावनेर यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे रिपोर्ट दिली की, दिनांक २५/११/२०२५ चे रात्री २२/०० वा. ते २६/११/२०२५ चे पहाटे ०५/०० वा. दरम्यान अज्ञात चोरटयानी फिर्यादीचे राहते घराच्या दरवाजा तोडुन घरातुन रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ३,६५,०००/- रूपयांचा मुद्देमाल चोरी केला. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून कलम ३०५(अ), ३३१ (४), ३ (५) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सावनेर पोलीसांनी गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या अधारे दिनांक ३०/११/२०२५ रोजी आरोपी कं १ शेख अश्पाक शेख मुस्ताक, वय ४३ वर्षे, रा. आजाद कॉलंनी, बडा ताजबाग यास नागपुर येथुन ताब्यात घेवुन अटक केले. नमुद आरोपीकडे पोलीसांनी सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार आरोपी कं २ शाम उर्फ काल्या रामाजी पुंड, वय ३० वर्ष, रा. महालक्ष्मी नगर, गल्ली कं ३, वांजरा रोड, कळमना, ह.मू इंदिरा माता नगर, बिनाकी, मंगळवारी, यशोधरा, नागपूर आणि एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांच्यासह मिळुन सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. दिनांक ११/१२/२०२५ रोजी आरोपी कं २ शाम उर्फ काल्या रामाजी पुंड याला अटक करण्यात आली. सावनेर पोलीसांनी नमुद आरोपीतांकडुन गुन्हयातील चोरीस गेलाला मुद्देमाल जप्त केला आहे.




