spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी पोलीस स्टेशन नरखेड आणि कोंढाळी हद्दीतील मतदान केंद्रांना दिली भेट

नरखेड :-  नगर परिषद नरखेड, नगर परीषद रामटेक आणि नगर पंचायत कोंढाळी येथे सार्वत्रिक निवडणूक असुन त्या अनुषंगाने आज दिनांक १५/१२/२०२५ रोजी मा. श्री. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी पोलीस स्टेशन नरखेड आणि कोंढाळी हद्दीतील मतदान केंद्रांना भेट दिली. पोलीस अधिक्षकांनी स्वतः मतदान केंद्रांची पाहणी करून मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या उपाययोजना तपासून घेतल्या. संबधीतांना महत्त्वाच्या सुचना दिल्या. सदरवेळी पराग पोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, ना.ग्रा. सहा पोलीस निरीक्षक अजित कदम, प्रभारी अधिकारी नरखेड, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी, प्रभारी अधिकारी कोंढाळी हे हजर होते.

Popular Articles