spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल – भिवापूर पोलिसांची कामगिरी.

 

भिवापूर दि. 27 – पोलीस स्टेशन भिवापूरच्या हद्दीत दिनांक २६ जून २०२५ रोजी गस्त घालत असताना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निलज येथून भिवापूर मार्गे उमरेडकडे अवैधरित्या व विनापरवाना रेतीची वाहतूक केली जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तास कॉलनी शिवार येथे नाकाबंदी केली असता, संशयित अशोक लेलँड १६ चाकी ट्रक (क्रमांक एम.एच.३५ ए.जे.१८२२) हा दिसून आला. सदर ट्रक थांबवून पोलिसांनी चालकाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव अमीर खान जमीर खान पठाण (वय ३२ वर्षे, रा. बाबा मस्तान शाह वार्ड, ता. व जि. भंडारा, ह.मु. सायका नगर, अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा) असे सांगितले. परवाना मागितल्यावर चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. वाहन मालकाविषयी विचारल्यावर, फुरकान अब्दुल लतिफ शेख (रा. घोटी, गोरेगाव, जि. गोंदिया) याचे वाहन असल्याचे सांगण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ७ ब्रास रेती (अंदाजे किमती ₹३५,०००/-) आढळून आली. तसेच ट्रकची अंदाजे किंमत ₹३०,००,०००/- असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹३०,३५,०००/- इतकी झाली. सदर प्रकरणी वाहन चालक आणि मालक याच्या विरूध्द पोस्टे भिवापुर येथे कलम ३०३(२), ४९(२) भा.न्या. सं सहकलम ४८ (७), ४८ (८) म.ज.म. संहीता सहकलम ४.२१. खान खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम, सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी ट्रक आणि रेती जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

Popular Articles