किशोर साहू, मौदा,ता.३०:- गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली , केंद्रप्रमुख धानला राजू आंबिलकर यांच्या अध्यक्षतेखाली पीएम श्री जिल्हा परिषद दहेगाव शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या शिक्षण परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश इंगळे, उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके यांच्या प्रमुख उपस्थितीत धानला केंद्राची शिक्षण परिषद दहेगाव येथे घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजू आंबिलकर यांनी शिक्षण परिषद घेण्यामागची पार्श्वभूमी सर्व शिक्षकांना सांगितली. या शिक्षण परिषदमध्ये कविता खडसे यांनी भाषा विषय याबाबत मार्गदर्शन केले. प्रज्ञा रामटेके यांनी गणित विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. गजानन बेले यांनी नवोदय विषय कशा पद्धतीने शिकवायचा याबाबत सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदा निमित्त जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नागपूर इथून शालीका, तसेच बिटुकुमार शिक्षण परिषद कशा पद्धतीने आयोजन केले जाते यांचे निरीक्षण करण्यासाठी आले होते .या शिक्षण परिषदेनिमित्त धानला केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक ,सहाय्यक शिक्षक या शिक्षण परिषदेला उपस्थित होते .पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे उपस्थित झालेल्या सर्व मुख्याध्यापक व सर्व सहाय्यक शिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी स्वागत केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद लीलाधर काळबांडे , राजेश रोहाड, सुधीर खंडाईत , सुधीर कांबळे, सुजाता बोदेले ,संगीता आंबिलढुके, प्रज्ञा रामटेके , उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी विशेष सहकार्य केले. राजेश रोहाड यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचे आभार मानले.




