किशोर साहू, मौदा, ता. 30 :- शुक्रवार ( दि. २८ नोव्हेंबर)ला प्राथमिक शाळा येसंबा येथील शाळेच्या मुख्याध्यापिका भावना प्रदिप सोरते यांच्या सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायत येसंबा उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सोरते यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छाने स्वागत करून निरोप देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्ष निधी मेश्राम, उपाध्यक्ष श्यामसुंदर राऊत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वरी घरजाळे, माधुरी झाडे ,आशा वर्कर सुषमा गजभिये, हिरा चकोले, अंगणवाडी सेविका माया चकोले, मदतनीस कांता गजभिये, अरूणा बांगडे, सुनिता गजभिये, वनिता चकोले,सोहन हारोडे,उत्तम मेश्राम, सुखदेव पानतावणे, नरेंद्र राऊत, कुमार गडे, गणेश बांगडे,संजय गजभिये, रघुवीर चकोले, सुनील कारेमोरे, चाचेर सर्कल मधील प्रत्येक जि.प.शाळेचे शिक्षक व शिक्षीका, गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.




