Home Latest News ‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ&period; राजेश देशमुख&comma; पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील&comma; पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ&period; रामचंद्र हंकारे&comma; उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ&period;संतोष भोसले&comma; सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया&comma; जीविका फाउंडेशन&comma; युनियन बँक&comma; अमेरिका &&num;8211&semi; इंडिया फाउंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>स्त्रियांमध्ये होणारा सर्व्हायकल कॅन्सर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे&period; एचपीव्ही लस आणि वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो&period; त्यामुळे या आजाराच्या बाबतीत महिलांमध्ये जनजागृती करणे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे&comma; असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी अभियानासंदर्भात सादरीकरण केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पाचा उद्देश सर्व्हायकल कॅन्सरच्या संदर्भात प्रतिबंध&comma;जनजागृती&comma; लसीकरण आणि समायोजित स्क्रीनिंगच्या माध्यमातून कॅन्सरचं संपूर्णपणे निर्मूलन करणं हा आहे&period; या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे&period; त्याचबरोबर आशा सेविकांकडून घराघरात जाऊन महिला वर्गासाठी सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंगची माहिती दिली जाणार आहे&comma;अशी माहिती यावेळी देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version