Home Latest News राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला आज औपचारिक सुरुवात झाली&period; मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला&period; देशातील ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे&period; केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था &lpar;सीएमएफआरआय&rpar;आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जनगणनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या मोहिमेचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे नसून देशातील सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती&comma; ५६८ मासेमारी गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रे यांचा तपशीलवार अभ्यास करून सागरी क्षेत्रातील धोरणनिर्मिती व नियोजनाला दिशा देणे आहे&period; या अंतर्गत मच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थिती&comma; पायाभूत सुविधा&comma; उपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभांबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जनगणनेचे डिजिटायझेशन —<&sol;strong> व्यासएनव्ही प्रणालीद्वारे नवे युग प्रथमच ही जनगणना पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सीएमएफआरआय ने विकसित केलेल्या &OpenCurlyQuote;व्यासएनव्ही’ अॅप प्रणालीद्वारे गणकांना टॅबलेट पीसी वितरित करण्यात आले आहेत&period; या अत्याधुनिक प्रणालीमुळे डेटा संकलनात अचूकता&comma; पारदर्शकता आणि वेग येणार असून शासनाला धोरणनिर्मितीसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version