Tuesday, March 17, 2026
spot_imgspot_img
spot_img

महाकाली मंदीर सत्रापुर-कन्हान येथे २३ मार्च पासुन चैत्र नवरात्रौत्सव 

कन्हान :- जय महाकाली सेवा समिती सत्रापुर (कन्हा न) ता. पारशिवनी, जि. नागपुर व्दारे कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक, प्राचिन महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे घटस्थापना करून नऊ दिवस चैत्र नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे .

“सर्व दुःख हरून मनोकामना पूर्ण करणारी आई जय महाकाली”

कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक रेल्वे पुलाची साक्ष देणारे आणि बंगालच्या कारागिरांना साक्षात दर्शन देणा-या सत्रापुरचे जय महाकाली मंदिर हे एक प्राचिन अत्यंत जागृत देवस्थान आहे. या देवी च्या दरबारात दर वर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पंचमी सोमवार (दि.२३) मार्च २०२६ ला सकाळी १० वाजता जय महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे विधीवत घटस्थापना करून चैत्र नवरात्र उत्सवाची सुरूवात कर ण्यात येणार आहे. नऊ दिवस सकाळ, सायंकाळी पुजा, आरती व जस, भजन गायनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून मंगळवार (दि.३१) मार्च २०२६ ला सकाळी ९ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन केल्यावर महाप्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. आई महाकालीच्या प्रत्यक्ष साक्षात्काराने पुण्य झालेल्या या पावन भूमीत नतमस्तक होऊन आई महाकालीच्या दर्शनाचा लाभ घेऊन आप ले जीवन कृतार्थ करावे. असे आवाहन जय महाकाली सेवा समिती, सत्रापुर (कन्हान) चे सचिव प्रकाश कडु हयानी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com