Home Latest News चांदा प्लास्टिकला 5 हजाराचा दंड,150 किलो प्लास्टिक जप्त

चांदा प्लास्टिकला 5 हजाराचा दंड,150 किलो प्लास्टिक जप्त

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे सदर प्रतिष्ठानावर 5 हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सोमवार 22 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे बाजारातील दुकानांची पाहणी सुरु असता गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 5 पोते प्लास्टिक पिशव्या असल्याची माहिती उपद्रव शोध पथकास माहिती मिळाली&period; पाहणी केली असता एकुण 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने सदर साहित्य जप्त करण्यात आले असुन 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे&period; पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे&period;मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे&period;यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन&comma; आयात&comma; साठवणूक&comma; वाहतूक&comma; वितरण&comma; विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे&period; सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ&period; अमोल शेळके&comma;भुपेश गोठे&comma;शुभम खोटे&comma; शुभम चिंचेकर&comma;राहुल गगपल्लीवार&comma; पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version