spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय स्थायी समिती सभा २० मार्च रोजी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय स्थायी समिती सभा शुक्रवार, दि. २० मार्च रोजी दुपारी ४.०० वाजता स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेला सन २०२५-२६ चा सुधारित अर्थसंकल्प तसेच सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ९६ अन्वये स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. सदर अर्थसंकल्पावर नियमानुसार चर्चा करण्यात येणार आहे.

दि. १६ मार्च रोजी स्थायी समिती सभापतींची निवड झाल्यानंतर ही पहिली सभा आयोजित करण्यात येत आहे. सदर सभेस स्थायी समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तसेच, यानंतर चालू महिन्यात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Popular Articles