spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बालिकेवर अत्याचार; आरोपीला २० वर्ष सक्षम कारावास

– पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल 

पांढरकवडा :- अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पांढरकवडा (केळापूर) येथील विशेष न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्यात शुक्रवारी (दि. २) निकाल देत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. प्रशांत ठाकरे, रा. नायगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सन २०२३ मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. आरोपी हा पीडितेच्या घरासमोर राहत होता. पीडितेचे आई- वड़ील कामावर गेल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला. त्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. धमकीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. काही महिन्यांनंतर पीडितेची तब्येत बिघडल्याने तिला वणी येथे व त्यानंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत पीडिता २० आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले, नागपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढ़ील तपासासाठी तो वणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणांचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार मायाताई चांदे यांनी केला. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करून प्रकरण पांढरकवडा येथील विशेष न्यायाल्यात न्यायप्रविष्ठ करण्यात आले. खटल्यादरम्यान अतिरिक्त शासकीय आभियोक्ता प्रशांत मानकर यांनी अभियोजन पक्षाच्या वतीने सात महत्त्वाचे साक्षीदार तपासले. विशेष सत्र न्यायाधीश अभिजित देशमुख यांनी पीडितेची साक्ष, वैद्यकीय अहवाल तसेच सादर पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरविले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक संतोष मडावी यांनी काम पाहिले. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून लैंगिक गुन्हेगारांविरोधात कायद्याचा वचक निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.