spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चौकसेंचा पुढाकार : शेतमजुरांना ५ हजार घोंगसींचे वाटप

◼️अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनसेवा वर्ष

◼️प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचा पुढाकार

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक -: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तालुक्यात जनसेवा वर्ष आयोजित करण्यात आला. जनसेवा वर्षानिमित्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांच्या पुढाकारातून तालुक्याच्या अनेक गावात ५ हजार शेतमजुरांना निशुल्क घोंगसीचे वाटप करण्यात आले.

तालुक्याच्या अनेक गावात धान रोवणी सुरू आहे. रोवणी करतांना पावसापासून बचाव करण्यासाठी गोरगरीब मजूर महिलांना अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधानसभा क्षेत्र रामटेक अंतर्गत मौजा-मानापूर, भोजापूर, नगरधन, नगरधन टोली, हिरवा-हिवरी, सोनेघाट, चौघान, दुधाळा, रामटेक, हिरवाबेंडे, भिलेवाडा, सोनपूर, नाहीबी, मांगली, गुडेगाव, मुसेवाडी, मांद्री, पंचाळा, बोरडा, खुमारी, बोंद्री, भोंदेवाडा, संग्रामपुर, चिचाळा, चारगाव, बिजेवाडा सह इतर गावात शेतकरी व शेतमजुरांना ५ हजार निशुल्क घोंगसीचे वाटप पर्यटक मित्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांच्यातर्फे करण्यात आले. या उपक्रमामुळे शेताच्या बांधावरील लावण करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे.जनसेवा कार्यक्रम राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल भाई पटेल तसेच खासदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचे तर्फे राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.