spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावनेरच्या दादाजी मंदिर परिसरात घराला आग

– नगरपरिषदेच्या तत्परतेने आग आटोक्यात; एसडीपीओा खर्डे घटनास्थळी दाखल

सावनेर :- सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादाजी मंदिर परिसरात एका घराला सोमवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. हे घर वर्मा यांच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ सावनेरचे एसडीपीओ सागर खर्डे तसेच नगरसेवक महेश चकोले यांना माहिती दिली. त्यानंतर सावनेर नगरपरिषद प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच एसडीपीओ सागर खर्डे घटनास्थळी दाखल झाले. सावनेर पोलीस, नगरसेवक महेश चकोले तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नगरपरिषदेच्या पथकाने तत्परतेने आग विझविण्याचे काम हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणून पूर्णपणे विझवण्यात आली.

दरम्यान, हीतज्योती आधार फाउंडेशनच्या टीमनेही घटनास्थळी पोहोचून मदतीसाठी पुढाकार घेतला. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि मदत पथकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले.

या कारवाईत फायर ऑफिसर निखिलेश वाडेकर यांच्यासह शुभम गोलाईत, कृणाल बांबल, अतुल ठाकरे, सूरज ढोके आणि प्रेमचंद चव्हारे यांनी सहभाग घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेत किती नुकसान झाले याचा तपशीलही समोर आलेला नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.