spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाहन थांबवताना क्लिनरचा मृत्यू, खापा येथे दुर्दैवी घटना

 

खापा, ८ : खापा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोथुळणा मार्गावरील खैरी पंजाबराव गावाजवळ असलेल्या कनक कॉटन जिनिंग प्रा. लि. मध्ये गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ६.३० वाजता एका दुर्घटनेत एका क्लिनरचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विशाल लोहटा (१७, रा. हरियाणा) हा सीजी ०४ जे डी ४०९३ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कापसाच्या गाठी भरण्याच्या कामात होता. त्यावेळी, अचानक धक्का लागल्याने वाहन पुढे सरकले. विशालने ते थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ट्रक समोरच्या भिंतीला धडकला. यामुळे विशाल ट्रक आणि भिंतीच्यामध्ये अडकून गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेतून विशालला शवविच्छेदनासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालक मनोज कुमार चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनीषा चव्हाण करत आहेत. एएसआय नारायण बोरकर, पोलीस शिपाई पन्ना बटाउवाले आणि परवेज शेख यांनी प्राथमिक तपासणी व पंचनामा केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.