spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकसहभागातून दहन घाट परिसराची साफसफाई

– पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त मनपाचे विशेष अभियान

 नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित स्वरूप देण्याच्या दिशेने पाऊल टाकत पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील नागपूर महानगरपालिकेतर्फे झोननिहाय दहन घाट व कब्रस्थानांची व परिसरामध्‌ये आज (ता. 12) सखोल स्वच्छता अभियान राबविले.

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने 5 ते 21 जून या कालावधीत संपूर्ण शहरात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागातील दहनघाट, कब्रस्तान आणि परिसराची साफसफाई मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

महापौरांचा स्वच्छता अभियानात सहभाग

महापौर निता ठाकरे यांनी नेहरूनगर झोनमधील दिघोरी दहनघाटावर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी नगरसेविका मंगला गवरे व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

उपमहापौर लिला हाथीबेड यांनी हनुमाननगर झोनमधील नरसाळा दहन घाट परिसर स्वच्छ केला.

यावेळी नगरसेविका विद्या मडावी, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, झोनल स्वच्छता अधिकारी दिनेश कलोडे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र शेट्टी उपस्थित होते.

मोक्षधाम दहन घाट

धंतोली झोनमध्ये ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत मोक्षधाम दहन घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगरसेविका सुजाता कोंबाडे, नगरसेविका कांचन चव्हाण, नगरसेवक सुभाष नानवटकर, माजी नगरसेवक विजय चुटेले, झोनल स्वच्छता अधिकारी राजेश गायधनी यांच्यासह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, विष्णूदेव यादव, श्रिया जोगे, प्रिया यादव, पिनाकी बानिक, प्रतीक इसमपेल्लीवार, तुषार देशमुख यांच्यासह संबधित प्रभागातील नगरसेवक, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

वैशाली नगर घाट

आशीनगर झोनमध्ये ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत दहनघाट परिसरात स्वच्छता करण्यात आली.यावेळी झोन सभापती आसिफ शेख, नगरसेविका  रेखा पाटील, झोनल स्वच्छता अधिकारी भोला खोब्रागडे, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

गंगाबाई घाट, मोमीनपुरा मुस्लिम कब्रस्तान

गांधीबाग झोनमध्ये ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत गंगाबाई दहन घाट व कब्रस्तान परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे, झोनल स्वच्छता अधिकारी सुरेश खरे, स्वच्छता निरीक्षक निलेश गजभिये, दीपक खरे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

सहकारनगर दहन घाट

लक्ष्मीनगर झोनमध्ये ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत सहकारनगर दहन घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी झोनल स्वच्छता अधिकारी ऋषिकेश इंगळे, स्वच्छता निरीक्षक दिनकर गजभिये यांच्यासह संबंधित प्रभागातील मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत शांतीनगर व कळमना दहन घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

आज बस डेपोमध्ये स्वच्छता अभियान

पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या परिहवन विभागामार्फत शनिवारी (ता.13) स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत शनिवारी मोरभवन शहर बसस्थानक क्रमांक १ व २ येथे सकाळी 7 वाजता विशेष स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे उपस्थित राहणार आहेत.

तसेच व्हेरायटी चौक ते युनिव्हर्सिटी चौक या मार्गावरील बस पार्किंग परिसराची तसेच आकाशवाणी चौक ते आरबीआय चौक परिसरातील बस व बस थांब्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व कर्मचारी, चालक व वाहक यांना “स्वच्छता व पर्यावरण संरक्षण शपथ” दिली जाणार आहे. शिवाय प्रत्येक डेपोमध्ये “एक कर्मचारी एक वृक्ष” उपक्रम आणि प्लास्टिकमुक्त बसस्थानक व डेपो अभियान राबविण्यात येतील.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.