Wednesday, April 22, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आयुक्तांनी केली नाग नदीच्या स्वच्छता कामाची प्रत्यक्ष पाहणी

– पावसाळ्यापूर्वी नाग नदीची स्वच्छता करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- शहरातील नदी नाले यांची पावसाळ्यापूर्वी करावयाची स्वच्छता लक्षात घेता, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता.21) नाग नदीच्या स्वच्छता कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी नगरसेवक विनय दाणी, विजय ढोले, योगेश पाचपौर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त  राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, उपअभियंता पुंडलिक ढोरे, धरमपेठ झोनचे झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्वप्रथम अंबाझरी येथील क्रेझी कॅसलमधून जाणाऱ्या नदी पात्राची पाहणी केली. त्यानंतर व्हीएनआयटी,, सरस्वती माध्यमिक शाळा, रातुम नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, यशवंत स्टेडियम संगम पॉईंट, गवळीपुरा आणि मॉरिस कॉलेज मैदान व इतर ठिकाणांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नदीचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच पावसाळ्यापूर्वीच नाग नदी मधील गाळ आणि जलपर्णी काढण्याकरिता प्लास्टिक फिशर वापरून अडवता येईल का याची शक्यता तपासावी व नाल्यात मशिनरी उतरण्यासाठी रॅम्प तयार करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शहरात ज्या नाल्यांमध्ये मशिनच्या साहाय्याने सफाई करणे शक्य नाही, त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून सफाई पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तदनंतर त्यांनी मनपाच्या बैद्यनाथ चौक येथे असलेल्या कारखाना विभागाला भेट दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com