spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयुक्तांनी केली रामनगर मैदानाची पहाणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी(ता.८) रामनगर मैदानाची पाहणी केली. यावेळी मनपाच्या क्रीडा विशेष समिती समिती दर्शनी धवड, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील ७५ मैदाने विकसित करण्यात येणार आहे. मनपाद्वारे सहाही मतदान संघात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने युक्त अशा क्रीडांगणाचा विकास केला जाणार असून, शहरातील क्रीडापटू यांना याचा लाभ होणार आहे. याच संदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी रामनगर मैदानात करण्यात येणाऱ्या विकासाबद्दल माहिती जाणून घेतली. उपायुक्त मंगेश खवले यांनी मैदान विकसित करण्यासंदर्भात माहिती दिली.

Popular Articles