spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा अधिकाऱ्यांवर आयुक्तांची संक्रांत , अधिकारी कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवले ताटकळत

चंद्रपूर :- महानगरपालिकेत नव्याने आयएएस अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सकाळी दहा वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त अकनुरी नरेश महानगरपालिकेत दाखल झाले.

मात्र, त्या वेळी काही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले. काही वेळाने अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचे आढळून आले. परिणामी, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.

आयुक्त अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या अचानक धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.