spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रायफल लाईनचे कार्य दीड महिन्यात पूर्ण करा

– जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांचे निर्देश

नागपूर :- मनपाच्या जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी धरमपेठ झोन आणि सतरंजीपुरा झोन येथे जलप्रदाय विभागाशी संबधित विषयांवर बुधवारी (ता.13) आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी रायफल लाईनचे कार्य दीड महिन्यात पूर्ण करावे करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत नगरसेवक व नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्त  शेषराव गोतमारे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, कर आकरणी व कर संकलन विशेष समिती उपसभापती सुनील हिरणवार, नगरसेविका साधना बरडे, वर्षा चौधरी, पुजा पाठक, कल्पना द्रोणकर, नगरसेवक विजय होले, नगरसेवक अभिजित झा, विनय दाणी,  रामभाऊ आंबुलकर, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम यांच्यासह मनपाच्या जलप्रदाय आणि ओसीडब्ल्यू अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील पाणी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी रायफल लाईनचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक नगरसेवकाला पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक देण्यात यावे, टँकरची संख्या वाढवावी आणि दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. झोनमध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासोबतच, पावसाळ्यापूर्वीच नळाच्या पाईपलाईन साठी खोदलेले खड्डेयाचे योग्य रित्या पुनर्भरण करण्यात यावे बुजविण्यात यावे, त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे असे निर्देशही सभापती दिव्या धुरडे यांनी यावेळी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.