spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावकारी पथकाकडून यवतमाळमधील चार ज्वेलर्सची झडती

– आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त

यवतमाळ :- यवतमाळ तालुकास्तरीय प्रशासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांचे समितीच्या आदेशानुसार सावकारी पथकाने बुधवारी (दि.१३ मे) गैरअर्जदार पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स, वेदधारिणी ज्वेलर्स, यवतमाळ यांच्या दुकानात झडती कार्यवाही करण्यात आली. यामध्ये आक्षेपार्ह दस्तऐवज / सौदेपत्र, खरेदीखत व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे.

पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स, वेदधारिणी ज्वेलर्स, यवतमाळ यांचे विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार अर्जदार शुभांगी राहुल गुल्हाने यांचा दिनांक ११ मे २०२६ रोजी अवैध सावकारी करीत असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला.

या अर्जाच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरीता सावकारी पथकाने आज दिनांक १३ मे २०२६ रोजी गैरअर्जदार पलक ज्वेलर्स, विनायक ज्वेलर्स, राठी ज्वेलर्स, वेदधारिणी ज्वेलर्स, यवतमाळ यांचे दुकानांची झडती घेतली. त्यापैकी दोन परवानाधारक सावकार आहे व इतर दोन विनापरवानाधारक सावकार आहे. या कारवाई दरम्यान गैरअर्जदार यांचे दुकानातून काही प्रमाणात दस्तऐवज / सौदेपत्र, खरेदीखत व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या कागदपत्राची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

ही कारवाई सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक रिता बाळकृष्ण निनावे यांच्या नियोजनानुसार चार सावकारी पथक नेमण्यात आले. पथक क्र. १ मध्ये पथक प्रमुख सहाय्यक निबंधक घाटंजीचे कैलाश खटारे, , व इतर कर्मचारी, पथक क्र. २ मध्ये पथक प्रमुख दारव्हाचे सहाय्यक निबंधक व्ही. के. हिरूळकर व इतर कर्मचारी, पथक क्र. ३ मध्ये पथक प्रमुख यवतमाळच्या सहाय्यक निबंधक रिता निनावे व इतर कर्मचारी, पथक क्र. ४ मध्ये पथक प्रमुख आर्णीचे सहाय्यक निबंधक प्रकाश झळके व इतर कर्मचारी, तसेच ग्राम वसूल अधिकारी व मंडळ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी या कारवाई मध्ये सहभागी होते.

सदर संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विकास मीना, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता,जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, पोलिस निरीक्षक सुनील नाईक तथा तालुकास्तरीय प्रशासकीय समिती यांच्या मार्गदर्शनात सहकार विभाग, महसुल विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.