Home Latest News सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये...

सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला; मिरा-भाईंदरमध्ये खळबळजनक घटना

0

<p>मिरा-भाईंदर &lpar;Mira Bhayandar&rpar; परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे&period; सोन्याच्या लालसेपोटी एका 76 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली असून&comma; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत अधिक माहिती अशी की&comma; विठ्ठल तांबे &lpar;वय 76&rpar; हे 16 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले&period; नेहमीप्रमाणे घराबाहेर गेलेले तांबे काही वेळात परत आले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही साधता न आल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून चिंतेने काशिमिरा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सीसीटीव्ही तपासणी आणि धक्कादायक खुलासा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>17 व 18 सप्टेंबर रोजी पोलिसांनी तांबे कुटुंबियांसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली&period; तपासादरम्यान विठ्ठल तांबे हे शेवटचे एका स्थानिक सलूनमध्ये जाताना दिसून आले&period; यानंतर पोलिसांनी सदर सलूनचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आली&period;<&sol;p>&NewLine;<p>फुटेजमध्ये सलून मालकानेच विठ्ठल तांबे यांची गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले&period; त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले&period; इतकेच नव्हे तर&comma; आरोपीने मृतदेह सलूनच्या आतील भागातून ओढत नेतानाचा व्हिडिओही फुटेजमध्ये दिसून आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मृतदेहाची विल्हेवाट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>तपास अधिक खोलात गेल्यावर उघड झाले की आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह सलूनमधून बाहेर ओढून नेला आणि तो जवळच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला होता&comma; जेणेकरून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू नये&period; या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलून चालकाला अटक केली आहे&period; पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून&comma; आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का&comma; याचीही चौकशी केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या घटनेमुळे मिरा-भाईंदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे&period; स्थानिक नागरिकांमध्ये संताप असून&comma; वृद्धांना लक्ष्य करणाऱ्या अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abp माझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version