Home Latest News 125 किलो प्लास्टीक जप्त,5 हजार रुपये दंड

125 किलो प्लास्टीक जप्त,5 हजार रुपये दंड

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 125 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या या व्यक्तीकडून 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मंगळवार 16 सप्टेंबर रोजी बिनबा गेट रोडवरून येत असलेल्या एका दुचाकी वाहनावर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वाहून नेण्यात येत असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास आढळून आले&period; त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की बबन बनकर यांच्या घराच्या मागे असलेल्या राकेश तोतवानी यांच्या गोदामात त्या पिशव्या ठेवण्यात येत होत्या&period; तात्काळ छापा टाकून तपासणी केल्यावर सदर गोदामातून एकूण 5 पोते &lpar;अंदाजे 125 किलो&rpar; सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या&period; जागेवरच सदर साठा जप्त करण्यात आला असून नियमांनुसार 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे&period; पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे&period;मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे&period;यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन&comma; आयात&comma; साठवणूक&comma; वाहतूक&comma; वितरण&comma; विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे&period; सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ&period; अमोल शेळके&comma;भुपेश गोठे&comma;शुभम खोटे&comma; शुभम चिंचेकर&comma;राहुल गगपल्लीवार&comma; पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version