spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिरोंजी येथे संविधानाचा उत्साहात जागर, “संविधान- नागरिकांच्या आशा आकांक्षाचे प्रतिबंब” प्राचार्य संदीप भोंडे

खापा :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी (ता. सावनेर) येथे संविधान जनजागृती पंधरवाड्यानिमित्य विविध उपक्रमांद्वारे संविधान जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळा समिती सदस्य ओमेश भिमटे व सामाजिक कार्यकर्ते संजय गिरमेकर यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून केली. यावेळी बंडू बगमार, सुरेश लोहितकर, राजेश गजभिये व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान व्याख्यानमाला, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

दि. २६ रोजी ‘भारतीय संविधानाचा ७६ वा वर्धापनदिन’ संविधान आधारित नाटिका, गीत गायन घेऊन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सोपवितानाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी हुबेहूब वेशभूषेत साकारून उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर गावातील व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढून घोषणा देत संविधानाचा जागर केला.

गावातील तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांचे पूजन व माल्यार्पण नागलवाडी (ता.सावनेर) येथील सरपंच दिपाली योगेश ठाकरे व सामाजिक कार्यकर्ते सुरज निकोसे यांनी केले. या ठिकाणी विद्यार्थांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संदीप भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. ज्ञानेश दळवी, जेष्ठ शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, रामकृष्ण टेकाडे, दीपक नारे, दिनेश हजारे, मुरलीधर तवले, दिपाली दहीकर, बॉबी पर्बत, शिक्षकेत्तर कर्मचारी शुभम चटकवार, मारोती सोमकुवर, कुंदा बाजनघाटे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. विजय काळमेघ आणि प्रा. योगिता बुऱ्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक नारे यांनी केले.

Popular Articles